मं. वि. चे जाणे अकाली नसले तरी चुटपूट लावणारे आहे. पाध्येंच्या 'सकाळ' मधील 'हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व समाजाला सतत भाषाविवेक शिकवत राहिले. या विवेकाची समाजाला आज कधी नव्हे एवढी गरज भासत आहे. नेमके त्याच काळात राजाध्यक्ष आपल्यातून गेले आहेत.' हे वाक्य अत्यंत समर्पक वाटले.