टोपणनाव घेण्याचा मोह भल्याभल्या साहित्यिकाना झाला उदा. केशवकुमार, आरती प्रभू, ग्रेस.
वर्तमानपत्रात टोपणनावाने सदर चालवणारे बरेच जण आहेत उदा.  तंबी दुराई (दै. लोकसत्ता).
सन्न्यस्त व्यक्तींची पूर्वाश्रमीची आणि सन्न्यस्त जीवनातली  सद्गुरूनी दिलेली नावे वेगळी असतात. याला ढोबळमानाने टोपणनाव असे म्हणता येइल.
काही हौशी लोकानी आपल्या नावामागे 'भगवान', 'अमुकसम्राट', 'तमुकबाबा' अशा उपाधी लावणे, आणि टोपणनावे घेणे + ती बदलणे असे प्रकारही  केलेले  आहेत.

एकूणच टोपणनाव हा प्रकार इतक्या गांभिर्याने घेण्याची गरज वाटत नाही. मी जो मेल आयडी वापरून सदस्यत्व घेतले आहे, त्यावरून नाव उघड होते. शिवाय व्यक्तिगत ब्लोग ची लिंक पण दिलेली आहे. मुळात ओळख लपवणे हा मनोगतींचा हेतू असेल असे आजवर कधीच जाणवले नाही.

 अरुंधती कुलकर्णी आणि संजोप राव यांच्याशी सहमत. लपूनछपून हल्ला करण्यासठी टोपणनाव वापरू नये या बद्दल सहमत. मनोगतावर प्रशासकांचा वचक आहेच. हा मुद्दा मनोगतींच्या संदर्भात अप्रस्तुत ठरतो.

दिवटेजी, आपण नुकतेच सदस्य झालेले दिसता. आपले स्वागत!