<<त्यामुळे एखाद्या मुलीने या सदस्यांना 'सध्या' नकार दिल्यामुळे अपमान वाटून त्यांनी सरधोपटपणे उपवर मुलींवर जाहीररीत्या टीकासत्र सुरू केलेले आहे असे नाही.>>
येथे कोणावरही वैयक्तिक टिका करणे हा उद्देश नव्हता. तसेच याच आषयाचा लेख ई सकाळ व लोकसत्ता मध्ये पण वाचल्याचे आठवतेय. त्यामुळे असा प्रकार सर्वत्र दिसतो आहे असे म्हटलेय. केवळ मनोगत वरचेच सदस्य याला जबाबदार आहेत असे नाही. फक्त उदा. दाखल म्हणून लगेच त्या लेखाचा उल्लेख केला होता.
<<कुशाग्र यांनी आजकाल विवाह जमवताना काय अडचणी येतात व त्यांचे निराकरण कसे करता येईल असा साधासोपा प्रस्ताव मांडला आहे. >> माज्या अल्पमतीनुसार कुशाग्र यांनी मुलींनी(च) तडजोड करावी असा आग्रह धरला आहे. त्यांची वाक्ये पाहा : <<बर मुलींचीही लग्न अगदी पटकन जमतात अशातला भाग नाही पण सध्या लग्नसमस्या दोन्ही बाजूने असण्याचे मुख्य कारण मुलींच्या अपेक्षा बऱ्याच वाढल्या आहेत हे आहे>> <<मुलींनी आपल्या या अपेक्षांना मुरड घालणे इष्ट नव्हे काय? >>
<<व आम्हाला अशी मते व्यक्त करायचा अधिकार काय हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे काय याबाबत शंका उत्पन्न करावीशी वाटते.>>
तुम्ही जरुर तुमची मते व्यक्त करू शकता. परंतु लग्न ही प्रत्येकाची खाजगी बाब असताना (लोकांच्या) मुलीनी तडजोड करून लग्ने करावी असा आग्रह कोणीही कसे काय धरू शकते ? प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तसाच मुलीनाही आहे. त्याचे बरे वाईट परिणाम त्या भोगतील.
<<आणि अर्थातच असा आग्रह धरणारे तुम्ही कोण?? >> हा प्रश्न विचारण्याचा अधिकार म्हणण्यापेक्षा मी असे म्हणेन की माज्या अतिशय सात्त्विक संतापातून हा प्रश्न मी इथे उपस्थित केला आहे. कारण येथिल लेखक ज्या मुलींविषयी विधाने करतोय त्या मुलींपैकी एक किंवा त्यांची प्रतिनिधी असे मी माज्या बाब्तीत म्हणू शकते.
तेव्हा अशा प्रकारचे सल्ले मी माज्या उमेदवारीच्या काळात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पणे झेलले आहेत. त्यामुळे अशा वांझोट्या सल्ल्यांचा त्या परिस्थितीतून जाणार्या मुलीना किती मनस्ताप होतो याची मला पुर्ण कल्पना आहे. तसेच अशा प्रकारच्या तडजोडीच्या दबावाला बळी पडून लग्न केलेल्या आणि अता अगदीच सहन करणे अशक्य जाल्याने घटस्फोट झालेल्या ही काही मुली माझ्या अगदी जवळून पाहण्यात आहेत.
इतकी वर्षे 'नाही' म्हणाय्चा अधिकारच मुलींना नव्हता. आता कुठे समाजाच्या एका वर्गातिल मुलीना तो मिळू लागलाय असे दिस्तेय. तर ज्यांचा अशा मुलींच्या आयुष्याशी प्रत्यक्ष काही संबंध नाही , त्यांनी त्यांच्या लग्नाची काळजी का वाहावी ?