महाविद्यालयात असताना कादरखानी संवादांची विडंबनेच झालेली ऐकलेली होती. कुर्बानी वगैरे चित्रपटांतून त्यांची कामे पाहिल्यावर माझे मत त्यांच्या संवादांविषयी फारसे वेगळे नव्हते.

मात्र 'बाप नंबरी बेटा दस नंबरी' हा चित्रपट मी आमच्या कंपनीच्या आतिथ्यालयात थोडासा (उत्तरार्ध) पाहिला. तो मला आवडला. कादरखान ह्यांच्याविषयीचे मत बदलायला मदत झाली. दुर्दैवाने मला हा चित्रपट इच्छा असूनही पुन्हा कधीही पूर्ण पाहता आला नाही. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांना ह्या चित्रपटातल्या भूमिकेसाठी पारितोषिकही मिळालेले आहे. चू. भू.द्या. घ्या.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका वेगवेगळी आहे. त्यातले कुठलेच एक पात्र दुसऱ्या एखाद्या पात्रासारखे नाही.