घ्यायची असल्यास मतल्यातच घेता येते. मतल्यात अलामत निश्चित होत असते. त्यानंतर इतर कोणत्याही शेरात ती पाळली न गेल्यास भंग पावते. तुमच्या गझलेत तसे झाले आहे.
गझलेतील काही विचार चांगले वाटले; मतला व दुसरा शेर तसे चांगले आहेत.
सैतान असण्याचा आणि विरक्तीचा तसा काही संबंध नाही. कालपरवाची गृहस्थाश्रमात/संसारात किंवा ऐहिक सुखदुःखात रमलेली आसक्त व्यक्ती आज विरक्त आहे, असे तुम्हाला म्हणायचे असावे. चू. भू. द्या. घ्या. कालचा सैतान आज पूर्ण बदलून गेला (आणि अगदी जरी देवपदाला पोचला नाही) तर सज्जन होईल. त्याचा विरक्तीशी काही संबंध नाही, असे वाटते. अर्थात त्याला आता काहीच सैतानी कृत्ये करता येत नसल्याने विरक्तीची भावना आली असेल, तर काही सांगता यायचे नाही ;)