कादर खान यांच्या काही भूमिकांमधील (विशेषतः मार्गदर्शक बाप प्रकारच्या) सटलिटी, किमान शब्दांत/ओळींत बरेच जास्त सांगून जाण्याची शैली आवडते.
कदाचित त्यांनीच ते संवाद लिहिले असल्याने, त्यातून काय अपेक्षित आहे नि पोचवायचे आहे हे पक्के माहीत असल्याने
संवादफेकीची परिणामकारकताही वाढली असावी. थर्डक्लास विनोदी भूमिका, खलनायक, सहाय्यक अभिनेता, वडीलधाऱ्याची भूमिका अशा विविध भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या या अभिनेत्याचे भूमिकावैविध्य कधी कधी अचंबित करते. गोविंदा-कादरखान-शक्ती कपूर- डेविड धवन या (चांडाळ?
)चौकडीने गाजवलेला ९०च्या दशकातला काळ आठवतो. त्या शालेय दिवसांमधील अडनिडे वय नि अभिरुची लक्षात घेता त्यांचे सिनेमे आवर्जून पाहिले आहेत, हे आठवते. त्यांतील काही चित्रपट आजही पाहू शकतो 
महेश, बाप नंबरी बेटा दस नंबरी मधील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर मिळाले होते, हे बरोबर आहे. त्याचबरोबर तकदीरवाला मधील विनोदी भूमिकेसाठी स्क्रीन पुरस्कारही मिळाला होता.