<<
पुरुषाना मात्र कोणीही असे फारसे जज करताना दिसत नाही. भले मग ते अशिक्षित समाजातले व्यसनाच्या आहारी गेलेले पुरुष असो, बायकोला मारहाण करणारे असो किंवा सुशिक्षित समाजातील घरात अजीबात काम न करणारे पुरुष असो. पुरुष असे वागणारच हे गृहीत धरले जाते आणि एखादा जर हे सर्व करत नसेल तर त्याचे कौतुक केले जाते. ही विषमता आपल्या समाजात आहे हेच खरे.
हे निरीक्षण पूर्णपणे चुकीचे आहे. अशिक्षित किंवा सुशिक्षित समाजातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या पुरुषांना त्या समाजात काय किंमत राहते हे आपण जवळून पाहिले आहे काय? किंबहुना अशा पुरुषांच्या बायका या दिवट्या नवर्यांना सांभाळूनही स्वतःचा संसार कष्टाने व नेटाने चालवतात याचे किती कौतुक होते याची आपणास जाणीव नसावी. >>
टग्या, तुमच्या ह्या मताशी मी असहमत आहे! कारण ह्याच व्यसनी पुरुषांच्या कष्टाळू बायकांना ह्याच ''कौतुक'' असलेल्या समाजातील, नात्यातील, ओळखीतील काही पुरुषांकडून सलगी दाखवली जाण्याचा त्रास सहन करावा लागतो. मदत करण्याच्या नावाखाली काहीजण गैरफायदा घेऊ पाहतात व ते पुरुष असतात, स्त्रिया नव्हेत. त्यावर जर तिने विरोध केला तर तिच्या चारित्र्याविषयी शंका घेतली जाते, खोडसाळ विधाने केली जातात. मी अशा केसेस पाहिलेल्या आहेत म्हणून बोलते. स्त्रीचे चारित्र्य म्हणजे अक्षरशः उघडा पाणवठा... जाता येता कोणीही दगड मारावा अशी परिस्थिती आजही भोवताली पाहावयास मिळते. अगदी दोन पुरुषांमध्ये भांडणे झाली तरी आया-बहिणींवरून व त्यांच्या चारित्र्यावरून गलिच्छ शिव्या दिल्या जातात. पुरुषाच्या चारित्र्यावर त्याने कसेही वागले तरी फारसा फरक पडत नाही, मात्र स्त्रीने प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकले पाहिजे, तिच्या चारित्र्यावर जरासेही शिंतोडे तिचे आयुष्य बरबाद करतात या मनोभूमिकेतून वावरणारे चिक्कार लोक आजूबाजूला दिसतात.
बाकी चालू द्यात.