ज्या व्यासपीठावर सर्वसाक्षींनी लिहिलेला मदनमोहन यांच्यावरचा लेख वाचला, दिगंभांचा 'मारे गये गुलफाम' वाचला, तेथे कादरखानवरचा प्रशंसात्मक ( हा लेख गंभीरपणे लिहिला आहे, असे मी गृहीत धरतो) लेख वाचून 'कालाय तस्मे नमः' याशिवाय दुसरे काही सुचले नाही. हेच वाचायचे तर इतर काही संकेतस्थळांवर का जाऊ नये असा एक प्रश्न पडला.
('इथे वाचायची सक्ती आहे का? वाचू नका! ' हे उत्तर अपेक्षित आहेच! ) या न्यायाने शक्ती कपूर, करिष्मा कपूर, सुनील शेट्टी, अक्षयकुमार, अर्जुन रामपाल, लक्ष्मीकांत बेर्डे, रविंद्र महाजनी यांच्यावरचे लिखाण वाचायला लागते की काय अशा भीतीने कापरे भरले आहे!