पापाच्या जाणिवेने दुष्ट माणसांत असे बदल घडले आहेत की तो सुख, दुःखापलिकडे पोहोचला आहे..... म्हणजेच विरक्त झाला आहे‌.ऋषिमुनी विरक्तीला पोचलेले असतात..... वाल्याचा वाल्मीकी एका पातकाच्या जाणीवेनंतर झाला...... 
सैतान आणि विरक्ती हा विरोधाभास नसल्याने... आपण म्हटल्याप्रमाणे शेर प्रभावहीन झाल्याचे जाणवत आहे.सैतानाऐवजी आसक्त असता तर अपेक्षित परिणाम आला असता हे जाणवत आहे.
मक्त्यात अलामतीची सूट साहीर, मीर, इकबाल आदिंनी घेतली आहे..... काही वेळा मक्त्यात नांव गुंफताना वृत्तात ही गडबड गुलजारसाहेब, कतिल शिफाइ यांजकडून झालेली आहे..... अर्थात म्हणून मझ्या अलामती तील घेतलेल्या सातंत्र्याचे मी समर्थन करणार नाही......   भक्त, अशक्त असे अजून काफिये होते पण अपेक्षित परिणाम येत नसल्याने मी ते योजिले नाहीत.
आपल्या प्रतिसदाबद्दल धन्यवाद.

डॉ. कैलास गायकवाड.