कारण ह्याच व्यसनी पुरुषांच्या कष्टाळू बायकांना ह्याच ''कौतुक'' असलेल्या
समाजातील, नात्यातील, ओळखीतील काही पुरुषांकडून सलगी दाखवली जाण्याचा
त्रास सहन करावा लागतो. मदत करण्याच्या नावाखाली काहीजण गैरफायदा घेऊ
पाहतात व ते पुरुष असतात, स्त्रिया नव्हेत. त्यावर जर तिने विरोध केला तर
तिच्या चारित्र्याविषयी शंका घेतली जाते, खोडसाळ विधाने केली जातात. मी
अशा केसेस पाहिलेल्या आहेत म्हणून बोलते. स्त्रीचे चारित्र्य म्हणजे
अक्षरशः उघडा पाणवठा... जाता येता कोणीही दगड मारावा अशी परिस्थिती आजही
भोवताली पाहावयास मिळते. अगदी दोन पुरुषांमध्ये भांडणे झाली तरी
आया-बहिणींवरून व त्यांच्या चारित्र्यावरून गलिच्छ शिव्या दिल्या जातात.
पुरुषाच्या चारित्र्यावर त्याने कसेही वागले तरी फारसा फरक पडत नाही,
मात्र स्त्रीने प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकले पाहिजे, तिच्या
चारित्र्यावर जरासेही शिंतोडे तिचे आयुष्य बरबाद करतात या मनोभूमिकेतून
वावरणारे चिक्कार लोक आजूबाजूला दिसतात.
स्त्रीयांवरील अत्याचार किंवा तिचे चारित्र्य हा चर्चेचा किंवा प्रतिसादाचा मूळ मुद्दा नाही. नवरा व्यसनी असो वा नसो, नोकरी करणारा असो वा नसो, गरीब, मध्यमवर्गीय वा उच्चमध्यमवर्गीय असो किंवा नवराच नसो, ओळखीतील पुरुषांकडून सलगी दाखवण्याचा त्रास सर्व बायकांना सहन करावा लागतो व आपण उल्लेख केलेल्या इतर प्रसंगांतून जावेच लागते. दोन पुरुषांमध्ये भांडणे झाली तर जशी आया बहिणींवरुन शिव्या दिल्या जातात त्याचप्रमाणे दोन महिलांमध्ये भांडणे झाली तर आया बहिणींवरुनच शिव्या दिल्या जातात. (वडिलांवरून किंवा भावावरुन शिव्या दिल्याचे मी तरी ऐकले नाही. किंबहुना सखाराम बाईंडरमधील "हे नवरे लेकाचे पावणेआठ" वगळता वडील किंवा भावावरुन होणाऱ्या शिवीगाळीचा फारसा ऐकीव अनुभव मला नाही).
प्रतिसादातील मूळ मुद्दा, "पुरुषांना जज केले जाते की नाही, आणि ज्या निकषांवर त्यांना जज केले जाते त्या निकषांनुसार त्यांना वागणूक मिळते की नाही" असा होता. तर त्याचे उत्तर हे "पुरुषांनाही अनेक निकषांवर जज केले जाते, व्यसन, वागणूक व चारित्र्य यांबाबतीतील त्यांच्या वागण्यावर टीकाही होते" असे आहे.