<<त्यामुळे एखाद्या मुलीने या सदस्यांना 'सध्या' नकार दिल्यामुळे अपमान वाटून त्यांनी सरधोपटपणे उपवर मुलींवर जाहीररीत्या टीकासत्र सुरू केलेले आहे असे नाही.>>
येथे कोणावरही वैयक्तिक टिका करणे हा उद्देश नव्हता. तसेच याच आषयाचा लेख ई सकाळ व लोकसत्ता मध्ये पण वाचल्याचे आठवतेय. त्यामुळे असा प्रकार सर्वत्र दिसतो आहे असे म्हटलेय. केवळ मनोगत वरचेच सदस्य याला जबाबदार आहेत असे नाही. फक्त उदा. दाखल म्हणून लगेच त्या लेखाचा उल्लेख केला होता.
काही महिन्यांपूर्वी सकाळ न्यूज नेटवर्कने याच विषयावर सप्तरंग पुरवणीत(?) एक लेखमाला सुरु केली होती त्यात अनेक विषय हाताळले होते. त्यातील खालील दोन विषय ठळकपणे लक्षात राहिले. दुर्दैवाने सप्तरंग पुरवणीतील लेखन कसे शोधावे हे सकाळवर दिसले नाही.
१. शेतकरी नवरा नको गं बाई! (मुद्द्याचा सारांश असा होता की वरपक्षाकडे मोठी शेती व त्याद्वारे व त्यावर आधारित उत्तम उत्पन्नाचे साधन असले तरी मुलींना नोकरी करणाराच नवरा हवा आहे, त्यामुळे शेतकरी कुटुंबातील मुलांची लग्ने जमणे जमतच नाहीत.
२. मराठी शाळेत शिकलेला नवरा नको गं बाई! (मुद्द्याचा सारांश असा होता की मुलाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून झालेले असल्यास असला नवरा नको. मुलगा कॉन्वेंट शाळेत शिकलेलाच हवा. विशेष म्हणजे माझ्या दोन मित्रांना याच कारणास्तव नकार मिळाला आहे. अतिशय उत्तम पगाराची नोकरी असलेले दोन्ही मित्र एकापेक्षा अधिक परदेशवाऱ्या करुन आलेले आहेत. अमेरिकेत किंवा इंग्लंडात इंग्रेजी बोलताना त्यांना मराठी माध्यमातून शिकलेल्या इंग्रेजी भाषेची संवादासाठी अडचण आली नाही. मात्र मुलींना त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमाची अडचण जाणवली. येथे मुलींचा किंवा त्यांच्या व्यवसायाचा अपमान करण्याचा किंवा कमी लेखण्याचा हेतू नाही मात्र कॉन्वेंट शाळेत शिकलेल्या दोन्ही मुली केवळ चार अंकी पगारावर अनुक्रमे रिसेप्शनिस्ट कम अटेंडंट व प्राथमिक शाळेत तात्पुरत्या नोकरीवर होत्या.) अशा माध्यमिक प्रकारचे एकदोन नकार मिळालेला आमचा एक मित्र इतका निराश झाला की त्याने त्याचा लग्नाचा निकष 'मुलगी हवी' इतका कमी केला. (दुर्दैवाने त्या निकषात तडजोड करणे त्याला शक्यच नव्हते.)
<<कुशाग्र यांनी आजकाल विवाह जमवताना काय अडचणी येतात व त्यांचे निराकरण कसे करता येईल असा साधासोपा प्रस्ताव मांडला आहे. >> माज्या अल्पमतीनुसार कुशाग्र यांनी मुलींनी(च) तडजोड करावी असा आग्रह धरला आहे. त्यांची वाक्ये पाहा : <<बर मुलींचीही लग्न अगदी पटकन जमतात अशातला भाग नाही पण सध्या लग्नसमस्या दोन्ही बाजूने असण्याचे मुख्य कारण मुलींच्या अपेक्षा बऱ्याच वाढल्या आहेत हे आहे>> <<मुलींनी आपल्या या अपेक्षांना मुरड घालणे इष्ट नव्हे काय? >>
कुशाग्र यांनी मुलींनीच तडजोड करावी केवळ असा आग्रह धरलेला नसून मुलींना स्वत्वाची, स्वरुपाची (यात देखणेपणाचा संबंध नसून विनोबांच्या स्वरूप पाहा विश्वरुप पाहू नका या वाक्यातील स्वरुपाचा संदर्भ आहे) व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पटवून देऊन त्यांच्या अपेक्षांना योग्य ती मुरड घालण्याचे काम करण्यात पूर्वी पालक यशस्वी होत असत ते आता होत नाहीत हाही मुद्दा मांडला आहे जो आपण (सोयीस्करपणे) दुर्लक्षित केलेला दिसतो.
<<व आम्हाला अशी मते व्यक्त करायचा अधिकार काय हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे काय याबाबत शंका उत्पन्न करावीशी वाटते.>>
तुम्ही जरुर तुमची मते व्यक्त करू शकता. परंतु लग्न ही प्रत्येकाची खाजगी बाब असताना (लोकांच्या) मुलीनी तडजोड करून लग्ने करावी असा आग्रह कोणीही कसे काय धरू शकते ? प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तसाच मुलीनाही आहे. त्याचे बरे वाईट परिणाम त्या भोगतील.
अर्थातच
<<आणि अर्थातच असा आग्रह धरणारे तुम्ही कोण?? >> हा प्रश्न विचारण्याचा अधिकार म्हणण्यापेक्षा मी असे म्हणेन की माज्या अतिशय सात्त्विक संतापातून हा प्रश्न मी इथे उपस्थित केला आहे. कारण येथिल लेखक ज्या मुलींविषयी विधाने करतोय त्या मुलींपैकी एक किंवा त्यांची प्रतिनिधी असे मी माज्या बाब्तीत म्हणू शकते.
तेव्हा अशा प्रकारचे सल्ले मी माज्या उमेदवारीच्या काळात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पणे झेलले आहेत. त्यामुळे अशा वांझोट्या सल्ल्यांचा त्या परिस्थितीतून जाणार्या मुलीना किती मनस्ताप होतो याची मला पुर्ण कल्पना आहे. तसेच अशा प्रकारच्या तडजोडीच्या दबावाला बळी पडून लग्न केलेल्या आणि अता अगदीच सहन करणे अशक्य जाल्याने घटस्फोट झालेल्या ही काही मुली माझ्या अगदी जवळून पाहण्यात आहेत.
अशी मुले व मुली माझ्याही पाहण्यात आहेत. अनेक सल्ले उमेदवारीची तयारी नसताना तर अनेक सल्ले उमेदवारीच्या काळात झेलले आहेत. किंबहुना मुलींची लग्ने जमणे थोडे अवघड असते या विचाराचा पगडा समाजावर अजूनही असल्याने मुलीचे लग्न थोडे उशीरा जमले तरी तिला तितकेसे टोमणे सहन करावे लागत नाहीत. मात्र मुलाचे लग्न जमणे सहजशक्य असूनही या टोणग्याचे लग्न अजूनही जमत नाही म्हणजे याच्यातच काहीतरी कमी असली पाहिजे असे झोंबणारे टोमणेही पाहण्यात आहेत.
इतकी वर्षे 'नाही' म्हणाय्चा अधिकारच मुलींना नव्हता. आता कुठे समाजाच्या एका वर्गातिल मुलीना तो मिळू लागलाय असे दिस्तेय. तर ज्यांचा अशा मुलींच्या आयुष्याशी प्रत्यक्ष काही संबंध नाही , त्यांनी त्यांच्या लग्नाची काळजी का वाहावी ?
येथे आपण केवळ चर्चा करतोय. बाहेर कोणाची लग्ने जमतात, न जमतात त्याच्याशी आपल्याला फारसे देणेघेणे नाही. ओळखीतील कोणाची लग्ने जमली तर तर ते जेवायला बोलवतील की नाही याची काळजी मात्र वाटते.