वरील चित्रपटांत (कदाचित अनवधानाने) राहून गेलेल्या एका चित्रपटाचे नाव लिहितो - एक होता विदूषक. तो पाहिल्यानंतर तर 'इतर चित्रपटांत दिग्दर्शकांनी त्याचा कचरा केला' हे विधान सप्रमाण सिद्ध होते की काय, असे वाटते.
टायमिंगच्या मुद्द्याबाबतही सहमत. बनवाबनवी व शांतेचं कार्टं दोन्हीशी! त्यासाठी बनवाबनवी मधील 'धनंजय माने इथंच राहतात का..ठकठक..' हे दृश्य बघावे यातही अशोक सराफ जेव्हा 'वाट बघा' म्हणतो, तेव्हाचे त्याचेही टायमिंग सुंदर! व्यक्तिशः मला बेर्डेंपेक्षा सराफांचे टायमिंग जास्त स्पृहणीय वाटते.
असो. बनवाबनवी आणि शांतेच कार्टं या दोन कलाकृतींसाठी तरी बेर्डेंचे इतर शंभरेक टुकार चित्रपट/भूमिका नजरेआड करू शकेनसे वाटते.