हे खरेच आहे आणि हे असेच चालणार आहे, ही खूणगाठ मी तरी माझ्या मनाशी केव्हाच बांधली आहे. रोशन, मदन मोहन, शैलेंद्र वरचे लेख मागे पडतील आणि लवकरच कधीतरी हिमेश रेशमिया इत्यादिंवर प्रशंसात्मक लेख येतीलच, काही शंकाच नाही.

काळ पुढे चालत राहतो, मागचे जुने होते, त्याची जागा नवे घेते हे सर्व बरोबर आहे आणि त्याविषयी काही कुणाचा वाद नसावा. फक्त आपल्या येथे (भारतीय संदर्भात) हे मागचे जुने होणे ज्या वेगाने चालले आहे, ते सखेदाश्चर्यकारक आहे. दुनियेत आजही बीटल्सच्या गाण्यांचा जोरदार बोलबाला आहे. मायकेल जॅक्सनचे कवित्व पुढील दोन-तीन पिढ्यातरी सहज चालावे. पण आपल्या लता-आशा-रफीसाहेब-मुकेश जेमतेम एखाद दुसऱ्या पिढीतच 'जुने व टाकाऊ' झाले आहेत (लताचा उल्लेख अन्यत्र एका धाग्यात 'लता-आजी' असा केलेला नुकताच वाचला). हे मला थोडे अनाकलीय आहे!