टोपण नाव घेण न घेण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . लपवाछपवी असे मला तरी काही वाटत नाही , मी इथे नाव सांगितले आहे काही इतर ठीकाणी सांगितले नाहीये .
बाकी संजोप राव , आक्रामक भाषा हा शिवसेनेचा गुण नाही तो " गरम रक्ताचा " गुण आहे !
डरकळ्या फोडणारे डरकाळ्या फोडतात, समशेरी काढणारे समशेरी काढतात ,
" रक्त थंड " पडलेल्या ताटाखालच्या मांजरानी त्याना आत्मपरीक्षणाचा सल्ला देवू नये .
आणि सहज आठवल म्ह णून सांगतो , ह्या " शिवसेनट " भाषेमुळे मुंबै आपली राहीली आहे , आणि हिच " शिवसेनट" भाषा नसल्यामुळे बेळगावच घोंगड ६० वर्ष भिजत पडलय .
( प्रती प्रशासक : मनोगत हा पक्षनिरपेक्ष कट्टा असावा असे वाटते , महाराषट्राचा विचार करणाऱ्या पक्षाच्या धोरणात्मक भाषाशैली वर उपहासात्मक टीका बोचली म्हणून बोललो . विषयांतर वाटल्यास प्रतिसाद काढून टाकावा पण आमच्या भावना पोहोचवाव्यात . चुभुद्याघ्या)