सहचारिणीचा अर्थ समजू शकतो पण सहकारीण आणि सहकारिणी यात फरक काय?
मलाही  जाणून घ्यायची उत्सुकता आहे. सहकारीण हा शब्द हलकाफुलका (विनोदनिर्मितीसाठी वापरल्यासारखा) वाटतो. सहकारिणी हा शब्द कदाचित चुकीचा असावा.

माझ्या वाक्यरचनेत ग्रंथपाल आणि ग्रंथपालिका असा चुकीचा वापर झाला आहे काय? 
असेच काहीसे.  'कलिग' असली तरी तिला माझी सहकारी म्हणणेच योग्य असावेसे वाटते. जाणकार अधिक सांगतीलच.