पाच काळेकुट्ट इसम, हिमालयात, शंकराची तपस्या करत बसलेले असतात. दिवसांमागून दिवस जातात, मग आठवडे, मग महिने, मग चक्क वर्ष लोटतात, पण ते काही जागचे हलत नाहीत. न राहता, भगवान प्रसन्न होतात, आणि त्यांच्या जवळ येवून म्हणतात,

तुमच्या भक्तिने मी प्रसन्न झालो आहे, मागा काय मागायचे असल्यास !
पहिल्या भक्ताकडे पहात म्हणतात, बोल तुला काय हवे ?
पहिला भक्त - भगवान, मला गोरा करा .. मला ह्या काळेपणाचा कंटाळा आला आहे...
तथास्तु !! आणि क्षणातच तो काळाकुट्ट इसम, गोरपान होतो. सर्व जण त्याकडे आश्चर्यचकित होत पहात असतात, ५वा इसम मात्र गुपचूप हसतो.
भगवान शंकर - बोल तुला काय हवे ?
दुसऱ्याला विचारतात,
२रा - भगवान, मला ह्याच्यापेक्ष्या जास्त गोरा करा ..
असे म्हणताच ५वा पुन्हा हसु लागतो !
तथास्तु, भगवान म्हणातात, २रा पहिल्यपेक्षा जास्त गोरा झालेला असतो.
भगवान शंकर - बोल तुला काय हवे ?
३ऱ्याला विचारतात,
३रा - भगवान मला ह्या दोघांपेक्षा जास्त गोरा करा ..
५वा मोठ्याने हसतो, व कसाबसा गप्प बसतो. सगळेच त्याच्यकडे पाहू लागतात.
तथास्तु - भगवान वर देतात, आणि तो तिघांपेक्षा जास्त गोरा होतो.
भगवान शंकर - बोल तुला काय हवे ?
४था- भगवान, मला ह्या ३घांपेक्षा जास्त गोरा करा ,,
५वा, जोरजोरात हसु लागतो ....
तथस्तु - भगवान म्हणतात, आता ४था सगळ्यात जास्त गोरा !!
भगवान शंकर - बोल तुला काय हवे ?
मागु ? पाचवा इसम विचरतो....
मागकी... तुला काय हवे ते माग .. आज तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होतील ! - भगवान म्हणतात.
सगळ्यांकडे हसत-हसत बघत .. ५वा इसम म्हणतो..
ठिक आहे मग .. एक काम करा ... ह्या सगळ्यांना.. परत होते तसे काळे करुन टाका .......