राहूल गांधी, मायावती, ममता बानर्जी व उमा भारती हा अविवाहितांचा मर्यादित संच घेतला असता, 'विवाह न झाल्याने मानसिक संतुलन ढळले असल्याची' श्री. बाळ ठाकरे यांनी नुकतीच केलेली टीका फक्त राहूल गांधी यांच्याच वाट्याला आली आहे, हे कटाक्षाने लक्षात घ्यावे. तसे पाहता बेताल वागण्यात कु. मायावती, कु. बानर्जी किंवा कु. भारती या कमी नाहीत.