चाळिशीत लग्न केले की नवऱ्याचे स्वतःचे स्वतंत्र, कर्जाचा बोजा नसलेले घर हवे वगैरे अपेक्षा  पूर्ण होण्याची शक्यता असते.  ही तडजोड मान्य असेल तर अनुवय वर मिळणे सोपे.
गाडी तशी लवकर येते.  पण घर नसेल तर गाडी कुठे ठेवणार? आणि आईवडील जवळ नसतील तर मुले कोण सांभाळणार? त्यापेक्षा सासू-सासऱ्यांसह राहावे,  मुले जाणती झाली की , सासू-सासऱ्यांना स्वतंत्र जगू द्यावे.  त्यांनी तरी मुक्तपणे संसार कधी करायचा!