मुलांना सांभाळायला आया/ दाई / बेबीसिटर ठेवता येते. पालणाघरे आहेत. ( सकाळी ७- रात्री  ८ अशी )
स्वतःच्या जबाबदाऱ्या एकदा पूर्ण केल्यावर पुन्हा नातवंडांचे अभ्यास, आजारपण , इतर लाड आजीआजोबांनी करावे , कायमच ..ही अपेक्षा मला तरी योग्य वाटत नाही. 

दुसरा मुद्दा असा की पिढीत काही आजी आजोबा असेही आहेत की ज्यांना  नातवंडांना  सांभाळणे अवघड जाते, मुले बदलली आहेत , त्याच्या गरजा वेगळ्या आहेत.  अशा मुलांना सांभाळण्याची इच्छा व शारिरीक ताकद दोन्ही आजी आजोबांकडे नसू शकते ही एक शक्यता आहे. आजीआजोबांना हौसा मौजा आहेत, छंद आहेत.  त्यात काही गैर नाही.  आजीआजोबांनी त्यांचे आयुष्य मुक्तपणे जगावे.

मुले जाणती झाली की मग सासू सासऱ्यांना मुक्तपणे जगू देणे म्हणजे किती मतलबी , स्वार्थीपणा आहे?  
दोघांपैकी एक गचकला की उरलेल्याने मुक्तपणे संसार करायचा का? की दोघांनी नशिबाला दोष देत देत..

मुलांना आजीआजोबा हवे, आजीआजोबांना सून मुलगा इत्यादी.. हे सर्व स्वतंत्र राहूनही शक्य आहे. आज असा एक वर्ग समाजात आहे जो आर्थिक सुबत्तेमुळे या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकतो. अन्यथा आपली मुले / पाळणाकर/ नोकरीत तडजोड काही मार्ग काढून सांभाळणे पालकांचे कर्तव्य आहे असे माझे मत आहे.

चाळिशीत लग्न चा मुद्दा मान्यः)