आर्थिक सुबत्ता नसेल त्यांनी मुले पाळणाघरांत ठेवावीत? त्यापरीस मुले होऊच देऊ नयेत. म्हणजे सासू-सासरे, आया-दाया-बेबीसिटर्स कश्शाकश्शाची गरज पडणार नाही.
असे वाटते आहे की, आता फार दिवस राहिले नाहीत. भारतातून एकत्र कुटुंबपद्धती नामशेष होणार! एकत्र कुटुंब पहायचे असेल तर इटली किंवा स्पेनलाच जावे लागेल.
मला वाटते, मी 'सासू सासऱ्यांना मुक्तपणे जगू देणे' म्हटले होते. 'मुकेपणे मरू द्या' नव्हते.
काही आजी आजोबा असेही आहेत की ज्यांना नातवंडांना सांभाळणे अवघड जाते.
हं, हे बरोबर. चाळिशीत लग्न झाले की नातवंडे होईपर्यंत पंशविशीत लग्न झालेले सासू-सासरे सत्तर-पंचाहत्तरी गाठणार! मुले जाणती होईपर्यंत नव्वदी. म्हणजे स्वतंत्र होताहोता त्यांतला एखादा गचकणार. आणि, सासूसासऱ्यांचे लग्नही त्यांच्या चाळिशीत झाले असेल, तर सर्वच प्रश्न सुटले. सूनमुख किंवा जावईतोंड बघायलाच नको. न रहेगा बांस न बजेगी बांसुरी. सासूसासरेच नाहीत तर सासुरवास कुठला?