हा हिंदीतल्या हांजी हांजी करण्याच्या प्रवृत्तीचा परिणाम!  लताला जी लावले की तिची आजी होणारच.  ज्या माणसाच्या मागे मा आणि पुढे जी असते तो मराठी माणूसच नव्हे.  (लता ही हिंदीभाषक असून ती घरी मराठीनामक बोलीभाषा बोलते, असे मी अनेकदा हिंदी वृत्तपत्रांत वाचले आहे.) हल्ली  सभांसभांतून आणि दूरदर्शन-रेडियोवरील कार्यक्रमांतून हा तोंडपुजेपणा राजरोस आढळतो. याच्या पुढची पायरी म्हणजे शिवाजीचा उल्लेख अहोजाहोने करावा,  असा सरकारी फतवा. म्हणजे  लाळघोटेपणाची पराकाष्ठा! देवा, मराठीला या चमच्यांपासून वाचव.