केवळ माझ्या प्रतिसादातील दिसणाऱ्या काही वाक्यांनी भारतातून एकत्र कुटुंब पद्धती नाहिशी होईल असे वाटत नाही:)
पण ती निव्वळ फायदे आहेत म्हणून नसावी तर ही माणसे आपली आहेत, हे घर आपले आहे, एकमेकांच्या मनाचा विचार करून ,एकत्र येणारी चार माणसे असतील तर असावी असे वाटते.
तुमचे काम संपले , आमची मुले मोठी झाली, जा आता मजा करा! असे पंचाहत्तरीच्या आजीआजोबांना सांगणे किती योग्य आहे? कामासाठी लागतील तशी माणसे वापरणे हा एकत्रित पद्धतीचा यशस्वी होण्याचा परमोच्च क्षण का?
म्हाताऱ्या आईवडिलाचे तसे मुक्त होणे आणि आधी चे लादलेले जीवन जगणे हे दोन्ही मला न पटणारे आहे. त्याचा शेवट मुकेपणाने मरण्यात न होवो म्हणजे मिळवले.
मी ज्या एका वर्गाची गोष्ट करते आहे जिथे पालक आणि मुलगा दोघांना एकत्र राहायचे आहे ते तशीच अट कायम ठेवतात, ज्या मुलीला मान्य असते त्याच मुली असे संसार करतात. ज्या आजीआजोबांवर / मुलावर/ सुनेवर / मुलीवर अशी एकत्र पद्धती नाईलाजाने स्वीकारण्याची वेळ येते ती आनंदी चित्र मी पाहिलेले नाही.
आर्थिक सुबत्ता नसेल तर सर्व तडजोडी कराव्या लागतील हे स्पष्ट आहे. मुलामुलींना दोघांनाही एकत्र कुटुंब ही सुद्धा तडजोड वाटू शकते. अनेकदा छोटे गाव जिथे उत्त्पन्न फार नाही, किंवा कधी मुंबईसारखे शहर या ठिकाणी जागेच्या किंमतीमुळे दुसरे घर घेणे शक्य नसते म्हणून एकत्र कुटुंबे राहतात.
रोजची कटकट , आदळआपट करत आणि उपकार केल्यागत एकत्र राहायचे? हा नुसता दिखावा आहे एकत्र राहण्याचा.
सुबत्ता असून मतलबासाठी आजीआजोबा लागतात अशी काही घरे मी पाहिली आहेत. तिथे तुम्ही म्हणता तसे काम झाले की मुक्त केले जाते आजीआजोबांना...ज्या आजीआजोबांचे नशीब चांगले तिथे घरात तीन पिढ्या एकत्र नांदतात. आनंदाने !
इटाली आणि स्पेन मध्ये जायची गरज नाही भारतातही एकत्र कुटुंबे आहेत. महाराष्ट्रातही आहेत.
दुसरा मुद्दा असा की भारतात एकत्र कुटुंबे राहणार नाहीत म्हणून इटाली आणि स्पेन मध्ये जाऊन तिथे एकत्र कुटुंबे दिसतील असे वाटते का? बदलत्या जीवनमान, राहणीमुळे , नव्या पिढीच्या अपेक्षांमुळे तिथे सुद्धा बदल होत आहेत, झाले आहेत. कुटुंबप्रमुख आणि त्याच्या हाताखाली राहणाऱ्या तीन चार पिढ्या असे चित्र तिथे सुद्धा तेवढ्या प्रमाणात नाही. जुन्या कादंबऱ्यात सापडेल नक्की. एकत्र कुटुंबात राहण्याने कसे शोषण होत होते ते सुद्धा गुगलून सापडेल.
या देशात जी कुटुंबे एकत्र राहत आहेत ती काही कारणांमुळे. ही आधीच्या काळातही तशी राहत होती कारण व्यवसायामुळे ती गरज होती , म्हणून तशी
संस्कृती झाली. जशी गरज बदलेल तसे राहणीमान बदलेल. तसे चित्र बदलणारच.
आज एकत्रित कुटूंबाचे प्रमाण या देशातही कमी आहे, नव्या पिढीत मुले कमी आहेत. लग्न उशीरा होते आहे. अनेकजण लग्न न करता
राहत आहेत. जसे चित्र भारतात बदलते आहे तेच तिथेही झाले आहे.
तुमचा सगळा प्रतिसाद उपहासाचा असेल तर मुद्दा वेगळा पण नसेल तर मूलच होऊ देऊ नका असे मी म्हणाले नाही. मूल होणे, व्हावे असे वाटणे ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. पण असे मूल नको असणारे पती पत्नी (दोन करि अर्स, कोणत्याही इतर कारणानें -)भारतात असतील , आता नसतील तर काही काळानंतर दिसतीलही...