काळ पुढे चालत राहतो, मागचे जुने होते, त्याची जागा नवे घेते हे सर्व बरोबर आहे आणि त्याविषयी काही कुणाचा वाद नसावा.
मलाही मान्य आहे ही प्रक्रीया कायम सुरुच असते. पण  सगळे जुने आणि टाकाऊ झाले आहे असे मला वाटत नाही. अजूनही तुम्ही घेतलेली नाव माहिती असणारे लोक आहेत. बीटल्स आणि मायकेल जॅक्सन प्रमाणे ही नावे चालतीलच.

पण नव्या नावांची यादी येऊच नये आणि कायम हीच नावे  म्हणजे  मापदंड आणि तेच अंतिम सत्य असा भाव का असावा?
 या व्यक्तींनी एवढी उंची गाठली आहे की तिथे जाणे निव्वळ अशक्य ठरू शकते.  ह्या व्यक्ती अतिशय प्रतिभावान असल्या तरी चाहत्यांचा भरभक्कम पाठींबा ही सुद्धा एक बाब यशाकरता जबाबदार आहे.

पण प्रत्येक पिढीची आवडनिवड तीच कशी असेल? एखादी कलाकृती तुम्ही केव्हा ,कोणत्या मूडमधे,  कोणत्या वयात प्रथम ऐकता/ बघता/ वाचता त्यावर तुमचे मत पक्के होते असे वाटत नाही का? ते मत बदलण्याकरता मुद्दाम डोळस प्रयत्न करावा लागतो. दूरदर्शनवर जुने चित्रपट दाखवायचे तेव्हा बघितलेले( अनेकांच्या मते  )श्रेष्ठ कलाकृती असलेले चित्रपट, माझ्या वर्गातल्या अनेकांना आवडले नाहीत. मलाही काही आवडले नाहीत. कारणे काही असतील. कालांतराने त्यातले काही भावले.

 काढलेल्या  चित्राला , आवाजाला असे वयाचे बंधन नाही.   पण आज आशाबाई / लता बाई जे गातात ते आवडणारे त्यांच्याच चाहत्यात किती आहेत?

 आज समोर दिसतात ,वारंवार  कानावर ज्यांचा आवाज येतो ते कलाकार तरूणांना आवडले तर बिघडले कुठे? जोवर एकदा ठरवलेले मापदंड आहेत त्या उंचीवर जाता येत नाहीत असे कलाकार येत नाहीत तोवर लेखन, वाचन, ऐकणे , पाहणे असा कलेचा आस्वाद बंद करायचा का? की गेल्या दोन पिढ्यांना जे आवडते तेच या पिढीने आळवायचे?नव्याला कधी संधी न देताच? ज्यांना आपण आदर्श म्हणतो त्यांना सुद्धा त्याच्या उमेदवारीच्या काळात कुणाची तरी शैली गिरवावी लागली होती. पुढे त्यांचे स्वतंत्र नाव , शैली झाली ही वस्तुस्थिती आहे.

जे जुने आहे चांगले आहे ते या ओघातही कायम आहे.  इतर सर्व येईल, चार दिवस टिकेल आणि जाईल. त्याचा गवगवा पण तेवढाच चार दिवस.  येणाऱ्यात काही जास्त काळ टिकणारे आहे असे दिसले तर त्याला पाठिंबा द्यावा, नव्याला एक संधी द्यावी असे मत असायला काय हरकत आहे?

आता मुद्दा लता आजीचा- लता आजी झाली म्हणजे टाकाऊ झाली असे नाही.  ( कला / वयाच बंधन / संबंध हा वेगळा मुद्दा आहे. )  पण आज जिचे वय दहाबारा वर्षे आहे तिने ८० वर्षाच्या एखाद्या  स्त्रीचा उल्लेख काय म्हणून करावा   हा सुद्धा एक प्रश्न आहेच .  आज इंग्रजी माध्यमातली मुले लता मंगशेकर एवढे म्हणण्यापेक्षा लताच म्हणाले तरी पंचाईतः)








-