![]() |
क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे
वेड्या संध्येच्या अंगणी रात थरथरते
(येथे ऐका)
संदीप खरेचं एक खूप छान गाणं..
गाण्याची चाल अनवट, अनोखी परंतु तितकीच फ्रेश वाटणारी.. म्हटलं तर एका छान बडबड गीतासारखी, म्हटलं तर स्वत:शीच एखादं स्वगत म्हटल्यासारखी, आणि म्हटलं तर अगदी गप्पा मारल्यासारखी..आणि म्हणूनच या चालीचं कौतुक वाटतं!
कुणी जाई दूर तशी मनी हुरहुर
रात ओलावत सुरवाट मालवते
यातली 'रेमपसांनीसां', 'पपमपनीपगरे' या संगती सुरेखच आहेत.. दोन्ही निषादांचा सुंदर वापर केला आहे हे विशेष..कोमल गंधारही अगदी खास टाकलाय!
तालाचा अंदाज, ठेकेही अगदी छान..गाणं अगदी लयदार म्हणावं तसं!
मनी जागा एक जोगी त्याचे आभाळ फाटके
त्याचा दिशांचा पिंजरा, त्याच्या झोळीत चटके
भिजलेली माती त्याचे हललेले मूळ
त्याचे क्षितिजाचे कूळ त्या चालवते
क्या बात है.. लिहिलंयही मस्त..!
संदीपकडून अशीच छान छान गाणी मराठी रसिकांना नेहमीच ऐकायला मिळावीत हीच शुभेच्छा!
-- तात्या अभ्यंकर.