एकत्र कुटुंबपद्धतीलाही मर्यादा असणारच ना? म्हणजे समाजाने नीतिनियमाने मर्यादा आखलेल्या नसतील कदाचित; पण व्यवहारात काही मर्यादेपलीकडे एकत्र कुटुंबे वाढली असतील का? केव्हा ना केव्हा कुठल्या ना कुठल्या कारणाने कशा ना कशा प्रकारे ती विभक्त झालीच असतील. नाहीतर एव्हाना एकेक कुटुंब केवढे मोठे असते