RJ Unplugged येथे हे वाचायला मिळाले:
पेण सारख्या रुक्ष शहरात(?) लग्नाला जायचा योग पहिल्यांदाच आला. शहर एवढ्याकरिता की समस्त पेणकर ह्याने सुखावतिल.तर ११ तारखेला ३ उत्साही कडोंमकरानी आणि एका नविन पनवेलकराने सकाळी ९.३० च्या दरम्यान पेण शहर गाठले आणि तिथुन सुरु झाली कथा दोन गणपतरावांची. पेण एस.टी स्टँडवर पोचल्यावर तिथले स्वागताध्यक्ष आमचं स्वागत(?) करायला हिरिरीने पुढे आले. लहान गणपत मोठ्याच्या भेटीसाठी अधिर होता, पण मोठ्या गणपतला लहान गणपतचं ते तसं अधिर होणं आवडत नव्हतं, अर्थात त्याला कारणही तसंच होतं. मागे एकदा लहान गणपतने मोठा घास घेऊन मोठ्या गणपतला नामोहरम केलेलं बर्याच जणाना ...