श्रावण, तुमच्या या लेखामुळे काही आठवणींवर्ची धूळ झटकली गेली.  सुहासताई, सुनीतीताई या साऱ्यांशी माझ्या कामानिमित्त जवळून संबंध आला होता.  सुहासताईंच्या संशोधनाबद्दल वाचून मलाही आश्चर्य वाटले.  किती साध्या आहेत त्या!  हल्लीच्या दिखाऊपणाच्या दुनियेत आपल्याला एवढ्या साध्या माणसांची सवयच राहिलेली नाही.   आपल्याकडे असलेल्या-नसलेल्या गुणांचं पद्धतशीर आणि चकचकीत मार्केटिंग करणाऱ्यांच्या भाऊगर्दीत सुहासताईंसारखी साधी पण कमिटेड माणसं फारच दुर्मिळ आहेत.  त्यांना पुढील आयुष्यासाठी अनेक शुभकामना!