आढावा खूपच मनापासून भावला. खरंच खेळाडू म्हणून त्याचं मोठेपण निर्वादीत आहे तसेच 'माणूस' म्हणूनही. त्याचे कोण भक्त नाही? माझा मुलगाही तुमच्यासारखाच भक्त पण  भाग्यवान !  आयुष्यात एकदा तरी सच्चुला भेटाव असं त्याच स्वप्न होतं ते पूर्ण झालं. ज्यांना ज्यांना कळलं की तो सचिनबरोबर अर्धा तास होता त्या सगळ्यांना(त्यात मी पण) त्याचा हेवा वाटला. असो. माझ्या मुलाचं स्वप्न पूर्ण झालं तुमचही होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!