आजकाल मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत हे तर खरेच आहे. कोणत्याही फालतू कारणासाठी मुले नाकारणे ही फॅशनच झाली आहे. माझ्या दिरांसाठी मुली शोधताना याचा बराच अनुभव घेतला. आजकाल नुसत्या डिग्रीला कोणी विचारत नाही. त्यामुळे काहीतरी स्पेशलायझेशन करणे आवश्यक ठरते. मग याचीच ढाल बनवली जाते. मी इतकी शिकलेली आहे मग मुलगा जास्त शिकलेला असलाच पाहिजे. त्याला माझ्यापेक्षा पगार जास्त असलाच पाहिजे. गंमत म्हणजे बाकी बाबतीत यांना पुरुषांच्या बरोबरीत हक्क हवे असतात. मग पगार बरोबरीचा का चालत नाही? शिवाय एक गोष्ट अशीही आहे की लग्न जमेपर्यंत मुली शिकत राहतात. उलट मुलांना डिग्री घेतल्याबरोबर घराची जबाबदारी उचलावी लागते. मग शिक्षणात फरक येऊ शकतो. तेवढे कन्सिडर केले गेले पाहिजे. मुलगा दिसायला कसा आहे, त्याची राहणी कशी आहे, त्याची साधारणपणे परिस्थिती कशी आहे, (म्हणजे तो दोन वेळ खाऊन पिऊन सुखी असेल,(कमी पण)  प्रामाणिकपणे कमावणारा असेल तर मुलींनी जास्त नखरे करू नयेत. असे माझे स्पष्ट मत आहे. यासाठी मुलींच्या पालकांनी त्यांची मनोधारणा बदलली पाहिजे.