श्रावण,

अपवादात्मक का असेना पण तुलाही प्रेरणादायी लेखन करता येते, हे पाहून साश्चर्य आनंद झाला. तुझ्या लेखनाच्या ताकदीबद्दल वेगळ्याने लिहायची गरज नाहीच. सुहासताईंचे झपाटलेपण खूपच प्रेरणादायी आहे आणि काही चांगले करायला निघता येणाऱ्या प्रचंड अडचणींमधून जणूकाही "बघ. मी केलेय तर तूही नक्की करू शकशील.. पुढच्यावेळी अजून जास्त प्रयत्न कर." असेच सांगत हुरूप वाढवणारे आहे. लेख वाचायला सुरूवात केली तेव्हा माझं डोकं पाऽऽऽर सटकलं होतं कुठलंच काम मनाजोगतं होत नाहीसं पाहून.. आणि आता लेख वाचून संपल्यावर? डोक्यावर टपली मारून घेतली स्वतःच आणि "चल बे मामू, तैयार हो जा... भरपूर कामं हातावेगळी करायची आहेत.. चल पटकन.." असे स्वगत उद्गार निघाले हसताना. धन्यवाद, सुहासताई.