पण नव्या नावांची यादी येऊच नये आणि कायम हीच नावे म्हणजे मापदंड आणि तेच अंतिम सत्य असा भाव का असावा?
असे मी कुठे म्हटले आहे? मी तर हेच म्हटले आहे, की "काळ पुढे चालत राहतो, मागचे जुने होते, त्याची जागा नवे घेते हे सर्व बरोबर आहे आणि त्याविषयी काही कुणाचा वाद नसावा". खरे तर मापदंड वगैरे ही बदलत राहतील असे मी तरी मानतो. 'लता-आशा-रफी-किशोर' ह्यांपेक्षा श्रेष्ठही गायक-गायिका कदाचित येतील की!
आज समोर दिसतात, वारंवार कानावर ज्यांचा आवाज येतो ते कलाकार तरूणांना आवडले तर बिघडले कुठे? जोवर एकदा ठरवलेले मापदंड आहेत त्या उंचीवर जाता येत नाहीत असे कलाकार येत नाहीत तोवर लेखन, वाचन, ऐकणे, पाहणे असा कलेचा आस्वाद बंद करायचा का? की गेल्या दोन पिढ्यांना जे आवडते तेच या पिढीने आळवायचे? नव्याला कधी संधी न देताच?
वरीलप्रमाणेच.
मला वाटते कदाचित माझ्या मतमांडणीत काही चुकले असावे म्हणून माझ्या म्हणण्याविषयी आपला गैरसमज झाला असावा. माझा मुद्दा नवे येऊ नये, जुने तेच जगाने कुरवाळत बसावे असा अजिबार नव्हता. पण ज्या झपाट्याने आपल्या येथे हे जुने विसरत-- खरे तर 'टाकाऊ' होत चालले आहे, ते इतरस्त्र (पाश्चिमात्य देशातील परिस्थिती पाहता) जे आहे त्याहून विलक्षण वेगवान आहे असे मला दिसते. नवी पिढी, त्यांची बदलणारी आवडनिवड हे सर्व तेथेही आपल्याप्रमाणे आहेच की. थोडक्यात मी 'त्यांचे' व 'आपले' ही तुलना करीत होतो.
पण आज जिचे वय दहाबारा वर्षे आहे तिने ८० वर्षाच्या एखाद्या स्त्रीचा उल्लेख काय म्हणून करावा हा सुद्धा एक प्रश्न आहेच .
दहाबारा वर्षांच्या व्यक्तिने असा उल्लेख केला असता तर त्याचा मी येथे वैषम्याने अजिबात उल्लेख केला नसता. लिहीणारी व्यक्ती विशी- तिशीतील आहे, व ती हिंदी चित्रपटसंगीताविषयी काही टिपण्णी करीत होती.