मलाही  काही  मुद्दे मांडावेसे वाटतात. पुण्यात नुकताच घडलेला प्रकार वाचून काही प्रश्न पडले. एकतर ज्या स्त्रीवर अत्याचार झाला ती सुशिक्षितच नाही तर माझ्या मते उच्च शिक्षित होती. परदेशातून आलेली होती. तरी मूळ भारतातलीच होती. ती तिच्या लहानपणापासून इथल्या वातावरणाशी परिचित होती. तरीही बसची वाट न बघता खाजगी गाडीला हात दाखवून लिफ्ट मागण्याची चूक तिने का केली?  दुसरा मुद्दा असा की आधीच त्या गाडीत तीन माणसे (पुरुष) आहेत म्हटल्यावर त्यात ती का बसली? तिसरा मुद्दा असा की सकाळी किंवा संध्याकाळी गाडीत बसलेली 'ती' (मला नेमकी वेळ आठ्वत नाही) रात्री साडेदहा वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर का फिरली? वाटेत म्हणे ते हॉटेलात गेले की बार मध्ये गेले तेव्हा तिला स्वतःची सुटका करून घेता आली असती.चवथा मुद्दा  ती आजच्या जगात वावरणारी होती म्हणजे तिच्याकडे मोबाईल नक्कीच होता. (शिवाय परदेशातून आलेली) गाडीला काळ्या काचा असतीलही पण हातातल्या मोबाईलनेही ती त्या फोडू शकत होती ना? की त्या बुलेट प्रूफ होत्या? पाचवा मुद्दा मला वाटते ती ऑफिसात मिटींगसाठी  जात होती. म्हणजे ती सकाळी निघाली होती. ज्यांच्याबरोबर तिची मिटिंग होती त्यांनी तिच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केलाच असेल. मला एवढेच म्हणायचे आहे की घडल्या प्रकाराला तीच जबाबदार होती की नाही? इतक्या चुका जर सुशिक्षित स्त्रिया करतील तर अडाणी किंवा अल्पवयिनांचे काय? त्यामुळे आकांक्षा ताईंना सांगावेसे वाटते की बऱ्याचदा असल्या प्रकारांना बायका/मुलीच जबाबदार असतात.