माझे रामायण येथे हे वाचायला मिळाले:
अत्रिऋषींच्या भेटीपाशी अयोघ्याकांड संपले होते. अरण्यकांडामध्ये रामाचा तेथून पुढला वनातील प्रवास वर्णिला असून सीताहरणापर्यंत त्याचा विस्तार आहे. अत्रिऋषींच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात गेले. राक्षसांचा उपद्रव असलेल्या प्रदेशात ते बराच काळ फिरत राहिले असे म्हटले आहे. अनेक मुनींना भेटले सर्वांनी राक्षसांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी करून तूं आमचे रक्षण कर असे म्हटले. रामाने ते मान्य केले. हे मुनीना सतावणारे, नरभक्षक, यज्ञाचा विध्वंस करणारे (मानव)समाज ...