>>घडल्या प्रकाराला तीच जबाबदार होती की नाही?

नाही. सावधगिरीने वागून कदाचित हा प्रकार तिला टाळता आला असता, पण एखादी स्त्री आपल्याबरोबर खायला प्यायला आली म्हणजे पुढेही काही करता येईल, असे समजणे हा त्या तिघांचा विचार चुकीचा आहे. आणि तिने विरोध केल्यावर जबरदस्ती करणे केवळ गुन्हाच. अश्या पुरुषांमुळे सगळी पुरुषजात बदनाम होते. आमच्या मैत्रिणी गाडीच्या काचा वर केल्या की संशयाने बघू लागतात, त्याचे काय!