@नीता :

अरे वा!! मी जो मुद्दा मांडला आहे त्याचे अगदी योग्य उदा. तुम्ही लगेच दिलेत. त्या वेळची आणि मुलीची परिस्थिती काय होती याचा तुम्ही केवळ पेपर मधील बातमीवरून अंदाज बांधता आहात. एव्हढेच नाही तर लगेच तिलाच दोषी ठरवून मोकळ्या पण झालात. उत्तम !! तिच्या जागी उद्या तुमची मुलगी असती तरी सुद्धा हीच प्रतिक्रीया असती काय तुमची ??

बायकांनी सावधगिरीने वागायला पाहिजे हे एकदम मान्य. परंतु जर अनवधानाने चुक घडली तर अशा परिस्थितीत त्या बाईवर बलात्कार करण्यात पुरुषांची काहीच चुक नाही असे म्हणायचेय की काय तुम्हाला ? का अशा परिस्थीतीत सापडलेल्या बाईचा पुरुष फायदा  घेणारच , त्यात विशेष काय असेच वाटते असे दिसतेय.

त्या बाईचे जाउदे , श्रीमंत , मध्यम वर्गीय बायका स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेउ शकतील पण गरीब आणि असहाय्य बायकांनी काय करवे ? ज्यांचे आयुष्यच उघड्यावर असते . त्याना तर निमुटपणे अशा अत्याचारांना बळी पडावे लागणार.