उत्प्रेरक महाशय (तुम्ही फेक आय. डी. आहात काय? असो.),
बँक शब्दाला मराठी शब्द आहे.
टवाळ (टवाळा आवडे विनोद! हा विनोद तर नाही? असो.),
ते खरोखरीच मराठीत प्रचलित असलेले वेगवेगळे शब्द वापरू इच्छितात. तुमची काही हरकत? आणि का बरे असावी?
वेदश्री, हो. बँक = पतपेढी. आमच्या डोंबिवलीत एक 'कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी' आहे. ती बँकच असून वरील नाव अधिकृतपणे धारण करते. तेव्हा, ह्या प्रचलित मराठी शब्दाचा वापर सर्वांनीच करावा हे योग्य होईल.
भोमेकाका, पत = क्रेडिट हे खरे असले तरी पेढी म्हणजे युनियन नव्हे.
सुनिल, ब्यांक हा शब्द प्रचलित आहे (मराठीच्या अनेक बोलीभाषांतून मूल इंग्रजी शब्दाचा हा अपभ्रंश वापरात आहे. पण प्रमाणित मराठी भाषेचा तो भाग नाही.).
प्रवासी महोदय, अधिकोष हा शब्द प्रचलित आहे. पण संस्कृतोद्भव शब्दाला ही लोक, वापरायला कठीण म्हणून नाके मुरडणारच.
महेश, मराठीतही बाक = बाकडेच होते. सावकार लोक बाकडे वापरतच असत.
संतोष, द्रव्यकोष अथवा द्रव्यपेढी हे शब्द मला स्वतःला उचित वाटतात.
अमिबा, तुम्ही तुमच्या विषयासाठी दुसरे सदर उघडा. हे सदर प्रमाणित शब्दांच्या शोधासाठी असावे असा माझा समज आहे.
संतोष, उत्तम सल्ला. अमिबांनी तो मानावा ही विनंती.
छायाजी, तुमचे बरोबरच आहे.