<<अशिक्षित किंवा सुशिक्षित समाजातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या पुरुषांना त्या समाजात काय किंमत राहते हे आपण जवळून पाहिले आहे काय? किंबहुना अशा पुरुषांच्या बायका या दिवट्या नवऱ्यांना सांभाळूनही स्वतःचा संसार कष्टाने व नेटाने चालवतात याचे किती कौतुक होते याची आपणास जाणीव नसावी >>

अगदी अगदी . अशा खस्ता खात पिचत  दिवट्या नवऱ्यांना सांभाळून सर्व अन्याय सहन करत संसार करणार्या बायकांचेच कौतुक होणार. पण यातल्या एखादीने ठरविले की हे सहन करणे मला शक्य नाही. आणि अशा नवऱ्याला सोडून तिने दुसर्या कोणा पुरुषाशी ( केवळ स्वतःच्या सुखासाठी ) संबंध ठेवले तर त्या पुरुषापेक्षा त्या बाईलाच नावे ठेवली जातात की नाही ? ती एकदम बाहेरख्याली , पापी आणि लगेच तिचा तो दारुडा नवरा बिचारा.

जोपर्यंत बाई सगळा अन्याय सहन करतेय तो पर्यंत ती देवी. जेव्हा ती यातून बाहेर पडून स्वतःचे सुख शोधेल तेव्हा लगेच खलनायिका.