ठरवून लग्न हा प्रकार म्हण्जे निव्वळ व्यवहार आहे. खरेतर लग्नासारखा निर्णय घेताना एकमेकावर मनापसून प्रेम असणे , एकमेकांविषयी आदर असणे या गोष्टी अत्यावश्यक आहेत. परंतु ठरवून लग्न करताना असे प्रेम उत्पन्न होणे बहुतेकदा शक्य नसते. तेव्हा दोन्ही बाजू केवळ व्यवहार बघताना आढळतात. आज्पर्यंत इतकी वर्षे मुलींची बाजू पडती , कमी पणाची समजली गेल्याने मुलाकडचे जास्तीत जास्त अपेक्षा ठेवून , आप्ला होईल तेव्हढा व्यावहारीक फायदा करून घेताना दिसायचे. आता एका वर्गात मुलीदेखिल सक्षम जाल्याने आता मुली कडचे देखिल आप्ला होईल तेव्हढा फायदा करून घ्यायला बघतात.
त्यामुळे खरेतर हा मुली कडच्यांचा किंवा मुलाकडच्याचा दोष नसून दोष 'ठरवून लग्न' करण्याच्या पद्धतीचा आहे. जिथे मुला मुलीला एकमेकाची ओळख ही केवळ ( बाह्यओळख ) व्यावहारीक पातळीवरच होते. एकमेकांचा स्वभाव , अंतरंग जाणून घ्यायची संधी यात बहुतेकदा मिळत नाही. त्यामुळे समोरच्याची पात्रता या बाह्यरुपावरच ठरवली जाते जे या पद्धतीत अनिवार्य आहे.