एकमेकांविषयीचे प्रेम नि आदरभाव यांबाबत आमच्या दोघांच्याही मनात तिळमात्र शंका नाही.

अगदी खरे. सहवासाने प्रेम असते ते असे. येथे चॅट ह्या माध्यमातून सहवास झालेला आहे.

किंबहुना प्रेम, सहवास आणि सौंदर्य ह्यातले काय कशामुळे होते हे नक्की सांगता येत नाही. अनेक पिढ्यांपासून ह्या मुद्द्यावर वाद झालेला दिसून येईल.

प्रेमामुळे सहवास की सहवासामुळे प्रेम?
सहवासामुळे सौंदर्य की सौंदर्यामुळे सहवास?
सौंदर्यामुळे प्रेम की प्रेमामुळे सौंदर्य?

की हे सगळे एकाच भावनेचे आविष्कार आहेत?