अगदी अगदी . अशा खस्ता खात पिचत  दिवट्या नवऱ्यांना सांभाळून सर्व अन्याय सहन करत संसार करणार्या बायकांचेच कौतुक होणार.

असे नक्की होते.

पण यातल्या एखादीने ठरविले की हे सहन करणे मला शक्य नाही. आणि अशा नवऱ्याला सोडून तिने दुसर्या कोणा पुरुषाशी ( केवळ स्वतःच्या सुखासाठी ) संबंध ठेवले

असे बहुतांश वेळा होते.

 तर त्या पुरुषापेक्षा त्या बाईलाच नावे ठेवली जातात की नाही ? ती एकदम बाहेरख्याली , पापी आणि लगेच तिचा तो दारुडा नवरा बिचारा.

मात्र असे होत नाही. बायकोला बाहेरख्याली म्हटले गेले तरी त्या नवऱ्याची पूर्वपीठिका माहीत असल्याने नवऱ्याला बिचारा म्हटले जात नाही.

हे सर्व आजूबाजूला पाहिलेल्या घटना व परिचितांकडून त्यावर होणाऱ्या टिप्पण्या यावर आधारित मत आहे.