ठरवून लग्न व्यवहार आहे. हे म्हणण्यामागे उद्देश जरा नीट स्पष्ट करून लिहीते वरील प्रतिक्रियांवरून मला जे म्हणायचेय ते मी नीट पोचवु शकलेले दिसत नाहीये..
ठरवून केलेल्या लग्नातही अगदी प्रेम विवाहापेक्षा जास्त प्रेम , आदर नवरा बायकोअमध्ये असू शकते हे एकदम मान्य आहे. परंतु मला हे म्हणायचे होते की या नवरा बाय्कोंची प्रथम भेट , किन्वा 'स्थळ बघणे' हा प्रकार काही व्यावहरीक गोष्टींची पुर्तता होत असेल तरच होते. जसे की मुलासाठी/ मुलीसाठी अमुक एक पगार , वय , जात , रुप , रंग , उंची , जाडी ई. सर्व गोष्टी यात येतात. त्यामुळे या नात्याची सुरुवात ही अशी व्यावहारीक पातळीवर होते. नंतर मग दोघांमध्ये प्रेम , आदर बहुतेकदा निर्माण होतोच.
थोडक्यात प्रेम विवाहामध्ये मुलगी मुलाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये थोडे कमी जास्त मान्य करेल. परंतु ठरवून लग्न करताना मुलीकडचे त्यानी ठरवलेल्या पेक्षा कमी उत्पन्नाच्या स्थळाकडे बघणारच नाहीत.