भारतातून एकत्र कुटुंबपद्धती नामशेष झाल्यावर 'एकत्र कुटुंब' म्हणजे काय ते
पाहण्याची एवढीच ज्याला जबरी इच्छा असेल, तो इटली किंवा स्पेनचे पर्यटन
करायला कुरकुर करेल असे वाटत नाही.
या वाक्यातील 'कुरकुर' हा शब्द कृपया 'कुरकूर' असा वाचावा.
'एकत्र कुटुंबपद्धती' किंवा 'जॉइंट्ट फ्यामिली'च्या नावाखाली सुमारांचा
सावळागोंधळ, एकमेकांच्या पाठीमागे एकमेकांच्या कुचाळक्या, ... आणि एकंदरीतच ज्याचीत्याची ज्यातत्यात नाके आणि
एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या ही दुसरी बाजूसुद्धा...
एकत्र कुटुंबपद्धतीच्या उपरोल्लेखित 'गुणांच्या यादी'त 'कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसणे' या गुणाचीसुद्धा कृपया भर टाकावी. ('कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसणे' या वाक्प्रचाराच्या उगमाबद्दल कुतूहल आहे.)
एकंदरीत, 'सामूहिक जबाबदारी ही कोणाचीच जबाबदारी नसते' या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय एकत्र कुटुंबपद्धतीत यावा असे अल्पनिरीक्षणावरून वाटते. कदाचित वरकरणी असा प्रत्यय न येण्याची काही उदाहरणे दिसणे शक्य आहे, परंतु अशा उदाहरणांचा सखोल अभ्यास केल्यास, त्यात (१) अशा उदाहरणातील कुटुंबातील एकूणएक सदस्य हे व्यक्तिशः अतिशय जबाबदार प्रवृत्तीचे असणे, किंवा (२) अशा उदाहरणातील एकाच जबाबदार (कर्त्या?) सदस्याने सर्वांच्या जबाबदाऱ्या स्वतःवर ओढवून घेतलेल्या असणे, या दोहोंपैकी कोणतीतरी एक (आणि बहुतकरून दुसरी) शक्यता कार्यरत असल्याचे दृष्टिपथास पडावे, अशी अटकळ आहे. अन्य कोणतीही शक्यता नजरेस येत नाही. (चूभूद्याघ्या. )