प्रेमविवाहाच्या बाबतीत वाचलेल्या एक दोन गोष्टी आठवल्या.
"प्रेमविवाह म्हणजे एका पार्टीला दाबून खोट! " हे श्री. ना. पेंडश्यांच्या "लव्हाळी" कादंबरीतले वाक्य.
दुसरे म्हणजे एकदा पं. महादेवशास्त्री जोशी म्हणाले की आपल्याकडच्या प्रसिद्ध जोड्यांमधील एक नळ - दमयंतीचा अपवाद सोडल्यास कुठेही शुद्ध प्रेम दिसत नाही. दुष्यंत - शकुंतला जोडीची महाभारतातली हकीकत हा शुद्ध देण्याघेण्याचा व्यवहार होता.
विनायक