-->",आपला निकट परिवार, परिसर आनंदी राखण्यासाठी धडपडणे, आपण ज्या ठिकाणी, ज्या पायरीवर असू, तेथे यथाशक्ति प्रामाणिकपणे, नीतीने वागून कर्तव्य पार पाडणे, कष्टांना न भिणे, संघर्षापेक्षा सामंजस्याने कार्य साधेल असे बघणे,एक क्षणही आळसात न घालवणे, देवाला, समाजाला, परिस्थितीला दोष न देता सतत आत्मपरीक्षण करून पूर्वी घडलेल्या चुका सुधारत राहणे, वाणीवर ताबा ठेवणे,चेहरा व वाणी प्रसन्न राखणे, समाजव्यवस्था सुदृढ राहावी याकरिता केलेले नियम न कुरकुरता पाळणे, अशा काही साध्यासाध्या गोष्टीतून माणूस घडत जातो, मोठा होतो. पर्यायाने समाज आणि देशही मोठा होतो. शिस्तबद्ध कामसू व्यक्तींची बहुसंख्या झाली की त्या देशाची प्रतिमा तशी बनते. शिस्तबद्ध कार्यामुळे यश, प्रसिद्धी, धन, लक्ष्मी, आपोआप चालत  येतात."<--

किती लोक कमीत कमी इतके तरी करत आहेत  ? तुम्ही एवढे सांगत आहात त्यावरून तुम्ही करत असाल .. मी पण इतके करतोच कि .. आणि असे बरेच करतात .. पण फक्त हे अपेक्षित नाहीये ..
आपण सर्व जण आपापलं काम योग्य आणि प्रामाणिक पणेच करतो .. पण फक्त तेवढाच पुरेसे वाटत नाहीये .
आणि विदेशी जाणे हे चुकिचे आहे हा तुम्ही चुकिचा अर्थ काढला आहे ..