अगदी अगदी नीताताई

माझा कोणताही गैरसमज झालेला नाहिये. मी वर जो मुद्दा मांडलाय त्याचेच विस्तृत स्पष्टीकरण आपण दिले आहेत. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या स्पष्टीकरणावरून मी असा निष्कर्ष काढते : ज्या मुलींवर बलात्कार होतो , त्यापैकी बहुतेक जणी स्वतःच्या मुर्खपणाने आणि कुसंस्कारीत वागणुकीने ही परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतात असे तुमचे मत दिसतेय. आणि शहाण्या सुसंस्कारीत मुलीवर अशी वेळ येत नाही असे तुमचे मत असावे.

यावर मी फक्त एव्हढेच म्हणेन की तुम्ही फार वरवर या समस्येकडे बघता आहात. ६ महिन्याच्या बालिके पासून ६० वर्षाच्या बाईपर्य्त अशा घटना घडल्या आहेत. आणि जवळचे नातेवाईक ( अग्दी वडिलांपासून ) ते अनोळखी व्यक्ती असे आरोपी आहेत. शहरापेक्षा खेड्यांमध्ये बलात्कारांचे प्रमाण जास्त आहे. जिथे बायका कोणताही आधुनिक पोषाख करत नाहीत की मर्यादा सोडून वागत नाहीत.

<<तेव्हा हे प्रकार इतके सर्रास होतही नव्हते.  पुरुषांची आजची मानसिकता बदलली आहे त्याला तुम्ही आम्ही काय करू शकतो? >> हे आजच घडतेय असे नाही. फक्त आज हे गुन्हे नोंदवायची हिम्मत बायकांमध्ये आली आहे म्हणून ते जगापुढे येतायेत. पुर्वी देखिल हे घडत होतेच फक्त ते बाईच्याच अब्रुच्या भीतिने दाबले जाउन लोकांपुढे येत नव्हते एव्ह्ढेच.

आणि परत मी वरती लिहिले होते तेच - श्रीमंत, मध्यम वर्गीय बायका स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेउ शकतील पण गरीब आणि असहाय्य बायकांनी काय करवे? ज्यांचे आयुष्यच उघड्यावर असते. त्याना तर निमुटपणे अशा अत्याचारांना बळी पडावे लागते.