पैसे दुप्पट होणे ह्या गोष्टीचं माणसाला प्रचंड म्हणजे प्रचंड आकर्षण आहे नाही का...मुळात पैसे दुप्पट कधी होतील ह्यावर गुंतवणूक अवलंबून असण्यापेक्षा, आपल्याला कधी आणि किती पैशाची गरज असणार आहे ह्यावर गुंतवणूक कुठे आणि कशी करायची हे ठरवणं जास्त सोयिस्कर आहे असं वाटतं. अर्थात, ह्या दृष्टिकोनातून सुद्धा म्युच्युअल फंड ची गुंतवणूक फायदेशीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, फक्त गुंतवणूक करताना पैसे दुप्पट कधी होतील एव्हढाच विचार फायदेशीर नाही.
बाकी, ७२ चा नियम सांगितल्याबद्दल धन्यवाद! इथून पुढे पैसे दुप्पट कधी होतील हे कॅल्क्युलेट करायला बरं पडेल
.