बायकांनी सावधगिरीने वागायला पाहिजे हे एकदम मान्य. परंतु जर अनवधानाने चुक घडली तर अशा परिस्थितीत त्या बाईवर बलात्कार करण्यात पुरुषांची काहीच चुक नाही असे म्हणायचेय की काय तुम्हाला ? का अशा परिस्थीतीत सापडलेल्या बाईचा पुरुष फायदा  घेणारच , त्यात विशेष काय असेच वाटते असे दिसतेय.
बलात्कार करणारे पुरुष निर्दोष आहेत असे कुणीही म्हटल्याचे दिसत नाही. मुद्दा हा आहे, की समाजात काही पुरुष असे असणारच. (समाज प्रबोधन होऊन सर्व पुरुष सद्गुणाचे पुतळे होण्यास बराच कालावधी आहे. आपल्या आयुष्यात तरी ते शक्य नाही) अश्यावेळी स्त्रीयांनी अनोळखी पुरुषांवर अश्या प्रकारे विश्वासून राहणे योग्य नव्हे. घाई असल्या मुळे जर तिने लिफ्ट घेतली असेल, तर हे लोक तिचा एवढा वेळ फुकट घालवत असतान तिने काहीच विरोध कसा केला नाही हे समजत नाही. (एक शक्यता आहे. जर तिच्यावर त्या माणसांनी अंमली पदर्थांचा प्रयोग केला असेल तर ती असहाय असू शकेल.... किंवा ती जर त्यांना आधिपासूनच ओळखत असेल तर... पण या पैकी काहीही प्रसिद्ध नाही).
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहीजे. आणि असे गुन्हे घडूनयेत म्हणून जे काही प्रयत्न करावे लागतात, त्यात महिलांनी काही किमान पथ्ये पाळणे ही एक दिशा आहेच. (अनोळखी) पुरुषांच्या बाबतीत स्त्रीयांनी वाजवी पेक्षा जरा जास्तिच संशयखोर रहायला काहीच हरकत नाही.