आकांक्षाताई मी कुठेही मुलींना कुसंस्कारित म्हटलेले नाही. जिच्यावर अत्याचार होतो ती शरिरापेक्षा मनाने जास्त खचते. आता ज्या ६ महिन्याच्या मुलींबद्दल तुम्ही म्हणता तिथे ही गोष्ट मान्य आहे की त्या मुलीला काहीच अक्कल नसते. पण आपला मुद्दा काय होता? पुण्यात जे झाले ती काय ६ महिन्याची मुलगी होती की ६० वर्षांची म्हातारी होती? तुम्हीच  यात उत्तर  दिले आहे. आता ६ महिन्याची मुलगी, जिचा स्वर्ग म्हणजे आईची कूस, किंवा ६० वर्षांची म्हातारी जी कदाचित त्या माणसाच्या आई किंवा आजीच्या वयाची त्यांच्यावर अत्याचार करणारा माणूस काय मनोवृतीचा असेल? अशा माणसांकडून कसली अपेक्षा करायची? बरे हे काही कोणाच्या तोंडावर लिहिलेले नसते. त्यामुळे स्त्रियांनी सावध रहायला हवे हेच अंतिम सत्य आहे.