भोमेकाका आणि हरिभक्त ह्यांच्याशी सहमत आहे....
खरे पाहता नीता यांनी त्यांचा अनुभव सांगीतला हे छानच झाले... अशीही अडचण होउ शकते हे कळले...
ज्यांना हे काही करायचे नाही त्यांनी सेवाभावी संस्थांना दान देणे हा उपायही उत्तम आहे...
पण ह्यावरून मला काही आठवते....
माझी आजी सांगते.... कि तीचे वडिल गेल्यावर खुप काळ ती त्यांना घरात पाहत असे.... आणि त्यांच्याशी बोलत असे....
माझ्या सासूबाइ त्यांच्या शेजारच्या काकू "मोठी आई" ह्यांच्याबद्दल्चा अनुभव सांगतात.
माझ्या सासूबाई कॉलेजमधे असताना एकदा रात्री ९ च्या सुमारास पिक्चर पाहून मैत्रीणींसोबत येत होत्या... त्या काळी ९ वाजता सामसूम असे.... मैत्रीणी म्हणाल्या आम्ही तुला घराच्या कॉर्नर पर्यंत सोडतो... आणि आम्ही दोघी परत जातो मागे... आई म्हणाल्या नको.... ह्या काय मोठी आई येताहेत मागुन.... मैत्रीणी बर म्हणाल्या व लगेच उजवीकडे गल्लीत मागे न पाहता निघून गेल्या... (सासूबाई शिक्षणासाठी नगर मध्ये राहत असत.... हा प्रसंग नेवासा येथील आहे..) घरी पोहोचल्यावर आजीने.. (सासूबाईंच्या आईने) विचारले... कोणी सोडलं घरी??? उत्तरः मोठी आई मागोमाग येत होत्या ... त्यांच्या पुढे पुढे आले...
दुसय्रा दिवशी सकाळी आजीने पुन्हा आईंना नीट विचारले व सांगीतले कि मोठी आई यांना जाऊन १५ दिवस झाले आहेत.... पण त्या कोणा कोणाला दिसल्या आहेत...
असे अनेक अनुभव अनेकांना येतात.... मग हयाच्या मागे काय आहे???
प्रज्ञा