विजय. तुम्ही तरी परदेशात आहात.... मि लग्न होउन मुंबई मधून पुण्यात आले तस मला पित्ताचा त्रास सुरू झाला...
माहेरी नारळाचा मुबलक वापर होता आणि इकडे शेंगदाणा मुबलक... हा मोठा फरक होता...
रोजच्या जेवणात १ इंच तरी ओल्या नारळ आपल्या पोटात जाइल असा प्रयत्न करा.... तुम्ही थंड प्रदेशात आहात सो नारळाने कोलेस्ट्रॉल वगैरे वाढायचा काहीही संबंध नाही.... आणि १ इंच तुकड्याने फार नारळ पोटात जात नाही.... जमल तर दिवसल १-२ फोडी संत्र खात जा.... ते सारक आहे... ह्या दोन्हीने पोट साफ रहायला मदत होइल...
राजगीय्राचा लाडू (वडी नाही त्यात शेंगदाणे असतात) १/२ - १ कप दुधात घालून रोज खाणे... राजगिरा पित्त कमी करतो.... हे शक्य नसेल तर रोज १ कप रूम टेंप्रेचर चे दूध प्या.... त्याचा खुप फायदा होतो...
ताक रोज प्यायले तरी फायदा होतो... पण ते जरासुद्धा आंबट नसले पाहिजे... आंबट असले तर अजून पित्त वाढेल.
आईसक्रीम तर सहज मिळत असेल.... पित्त होते आहे असे वाटले की २ चमचे आईस्क्रीम खायचे.... लगेच पोट शांत होते...
खायचा सोडा पाण्यात घालुन, विकत सोडा आणून रोज पिणे, ईनो पिणे यासारखे उपाय रोज करणे फार वाईट आहे.... त्याने काही वर्षात अल्सर सारखे विकार होतात....
आमच्या कुटुंबात २ होमेओपॅथिक डॉक्टर आहेत.... त्या होमिओपॅथी, बायोकेमिक व डॉ. बाथ फ्लॉवर मेडिसीन या तीन्ही पॅथी वापरतात .... तुम्हाला मी त्यातले एक औषध सांगून ठेवते.... "बायोकेमिक काँबिनेशन नंबर २५" एक मोठी बाटली आणून ठेबा... महिनाभर दिवसाला ३ वेळा ४-४ गोळ्या चघळून घ्यायच्या. त्या आधी व नंतर १५ मिनिटे काहीही खायचे.. प्यायचे नाही.... तुमचा त्रास जाईल...
प्रज्ञा.